नमस्कार मित्रानों ,
रविवार , २२ मार्च २०२०
कोरोना विरुद्धच्या लढाईतला महत्वाचा दिवस जो कि आपल्याला यशस्वीपूर्ण लढायचा आहे ...
तुम्ही शक्य तर निवांत उठा.
शक्यतो सकाळी 8-9 नंतर
(म्हणजे मॉर्निंग वॉकला पण सुट्टी द्याल)....
अगदी सावकाश कामाला लागा
😝😝
आवडीचा नाष्टा करा , जुने अल्बम काढून बसा...
मी कित्ती छान दिसत होते / होतो , अगदी नाजूक बाहुली वगैरे विशेषणे द्या स्वतःलाच😉😉
या आठवणींच्या जगात फिरून आलात की साधेसेच पण गरम गरम जेवा आणि दुपारी वामकुक्षी 😴😴 किंवा एखादे छानसे नाटक , घरच्या घरी बघा.
(डोकं बाजूला ठेवून एखादा गोलमाल सिरीज मधला सिनेमा 🎥🎥 देखील बघू शकता)
अभ्यासू मंडळींनी वाचन 📚📚करायला हरकत नाही 😉😉
बरोबर पावणे पाच वाजता मस्त ड्रेस 👚👗👠 घालून तयार व्हा.
पाच वाजता गॅलरीत , दरवाज्यात या आणि सगळे मिळून जोरजोरात टाळ्या 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 वाजवा...
संपूर्ण पाच मिनिटे
संध्याकाळी ५ ते ५.०५.
आणि हो एखादा सेल्फी 🤳🤳घ्यायला विसरू नका
नंतर होऊ दे तो फोटो viral 😄😄😄
आता मस्तपैकी आलं घालून चहा ☕☕ करा आणि हळूहळू एकेक घोट घ्या.
संध्याकाळी ६ ते ६.१५ सर्वजण मिळून ओंकार जप करा.
बघा स्वतःलाच किती प्रसन्न वाटेल ते....
आता दिवस किती मस्त गेला हे रंगवून रंगवून मैत्रिणींना सांगा. यमन राग आळवत , आठवत , ऐकत संध्याकाळी भेळ - सँडविच 🥪बनवून खा....
आजचा दिवस साजरा करा.
आणि हो.....
सगळ्यात महत्त्वाचे....
एकदाही वातावरणात नकारात्मक लहरी निर्माण होतील असे बोलू नका 😷😷
कोरोनाच्या बातम्या बघू नका.
अपवाद म्हणून फक्त आदरणीय मोदींचे भाषण ऐका.
छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून विचार करा की आपला हा गनिमी कावा आहे , कोरोनाला मानवी शरीर मिळणार नाही तब्बल ३० तास....
आजची रात्र , उद्याचे चौदा तास अधिक उद्याची रात्र.
शाहिस्तेखान तोंड लपवून पळाला. तो तरी बापडा दिल्लीला गेला. ह्या दुष्ट कोरोनाला तर पृथ्वीतलावरूनच हाकलायचे आहे आपल्याला.
तर मग लक्षात ठेवा.
रविवारी , २२ मार्च २०२०
सकाळी ७ ते रात्री ९
घरात बसून मौजमजा
संध्याकाळी ५ ते ५.०५
टाळ्यांचा कडकडाट
संध्याकाळी ६ ते ६.१५
ओंकार जप करा .
🙏🏻🙏🏻
धन्यवाद !!
Comments
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.