करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी झटत असलेले पुण्यातील नायडू हॉस्पिटल चा इतिहास । History Of Naydu Hospital , Pune
सध्या संपुर्ण जगात करोनानी हाहाकार घातला आहे. पूर्ण जग करोनाशी लढा द्याचा प्रयत्न करतय .तर चला आज आपण सव्वाशे वर्षा पासुन संसर्गजन्य अजारांशी मुकाबला करणाऱ्या पुण्यातील नायडू हॉस्पिटल विषयी जाणून घेऊया. सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला नायडू रुग्णालय करीत आहे . पुण्यात १८९७ मध्ये प्लेगने हाहाकार उडवून दिल्यानंतर संसर्गजन्य रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला . पुणे नगरपालिका , सबर्बन नगरपालिका , जिल्हा लोकल बोर्ड आणि मुंबई सरकार यांच्या सहकार्याने हे रुग्णालय सुरू झाले . या रुग्णालयाला कालांतराने ' डॉ . नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय ' म्हणनही संबोधले जाऊ लागले . प्लेग , देवी , कॉलरा , इन्फ्ल्युएन्झा , पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू ( एचवनएनवन ) , बर्ड फ्लू , सार्स , इबोला , निपाह आणि सध्या वेगाने पसरत असलेल्या करोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय पुणेकरांच्या दिमतीला उभे आहे . मुंबईतन १८९६ सुरू झालेल्या प्लेगच्या साथीचा १९ डिसेंबर १८९६मध्ये पुण्यातही प्रादुर्भाव झाला . रास्ता...