Skip to main content

उद्योगधंद्याचा सूर्योदय - Sunrise Of Business

 

                      


१ . उद्योगधंद्यासाठी भांडवल कसे उभे करावे ? -

 पुण्या - मुंबईबरोबरच इतर लहान मोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या , नॉन बँकिंग कॉर्पोरेशन , तसेच ना नफा - ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था कार्यरत आहेत , ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात . . . गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण , जामीन आहे . | अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत . बऱ्याचशा सहकारी बँका अशा महिलांना कर्ज देतात . यासाठी त्यांनी नवरा किंवा घरातली एक व्यक्ती आणि बाहेरचे दोन जामीनदार उभे करणे आवश्यक आहे . ज्यांच्याकडे पगाराची स्लीप आहे , अशा । महिलांना लाख ते दोन लाख भांडवल ' पर्सनल लोन ' खाली सहज उभे करता येऊ शकते .  तसेच को . ऑप ., बँका खाजगी बँका आणि शेड्यूल्ड बँका हे कर्ज उपलब्ध करून देतात . हल्ली बहुतांश बँका कर्ज देताना महिलांना प्राधान्य देतात , त्यामुळे भांडवलाची समस्या कमी झाली आह


२ . आपल्या व्यवसायासाठी मोठेल ध्येय कसे ठेवता येईल ? -

मी इथे ध्येय मोठे नाही , तर ' सुयोग्य ध्येय असले पाहिजे ' असे म्हणेन . प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे . ब्यूटी पार्लर , ड्रेस डिझायनिंग , टेलरिंग यांची दुकाने नाक्यानाक्यावर , गल्लोगल्ली दिसून येतात . ज्याला प्रचंड स्पर्धा आहेस व ज्यात सामान्य कौशल्य आहे , असा व्यवसाय करण्यापेक्षा वेगळे कौशल्य असणाऱ्या व्यवसायाचा पर्याय अवलंबा आणि सुयोग्य ध्येय बाळगा . . आपण व्यवसायासाठी किती वेळ देऊ शकतो , हासुद्धा महत्त्वाचा भाग आहे . कौशल्य आणि वेळ हे समीकरण जुळविल्यावर आपले ध्येय आखताना महिलांनी असा विचार करायला हवा , की माझ्याकडे जागा आहे की भाड्याने घ्यावी लागणार आहे . भाड्याने जागा घ्यायची झाल्यास गुंतवणूक आली ते पैसे आपल्या खिशातून जाणार , जर घरातील जागाच आपण यासाठी वापरू शकत असू , तर भाड्याचा खर्च वाचवु शकतो . त्यामुळे ध्येय ठेवण्याआधी माझ्याकडे कोणते कौशल्य आहे . माझ्याकडे किती वेळ आहे आणि त्यासाठी स्वत : ची की भाड्याची जागा उपलब्ध आहे , या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी . यानंतर प्रश्न येतो , तो म्हणजे घरच्यांचे सहकार्य मी कसे मिळवीन ? अनेक महिला उत्साहाच्या भरात व्यवसायाला सुरुवात करतात . नवरा , सासू - सासरे सुरुवातीला सहकार्य करू असे म्हणतात . पण हळूहळू ते कमी होत जाण्याच प्रमाण वाढत , त्यांना मदत करणे जमत नाही . मग सगळी धावपळ आपल्याला करावी लागते , जे अनेकदा शक्य होत नाही . त्यामुळे आपल्याला घरच्यांचे किती आणि कसे सहकार्य उपलब्ध आहे , याचा त्या महिलेने आढावा घेतला पाहिजे . सहकार्य नसेल , पण कुटुंबीयांशी चर्चा करून , संवाद साधून ते मिळवता येणे शक्य आहे का किंवा काही पर्याय निर्माण करता येतील का ते पाहावे . एकूणच सुयोग्य ध्येय आखताना आपले कौशल्य , आपण किती तास काम करू शकतो . जागा आहे का , घरच्यांचे सहकार्य कसे मिळवता येईल या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात .
                     

3 .मार्केटिंग कसे करावे ?-

 आपले काम नव्याने सरू करत आहात . ही नकती सरुवात असल्यामळे फार मोठे स्वप्न लगेच पाहायला नको . जागतिक बाजारपेठेचे स्वप्न पाहण्याची ही वेळ नाही . यासाठी अजन बराच वेळ आहे . इतर कुणाकडेच उपलब्ध नसणारे काम तुम्ही करत असाल आणि त्याची ' बल्क ऑर्डर ' घेणे शक्य असेल , तरच निर्यात शक्य आहे . अन्यथा नाही . सध्या तुम्ही घराजवळील आपल्या टप्प्यात असलेले मार्केट शोधा , ज्या मार्केटमधील बदलते ट्रेंड्स आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो , अशा | मार्केटचा विचार करा . मार्केटमध्ये स्पर्शापासून रोज बदल होत असतात . त्या ट्रेंडनुसार बदलत राहणे आवश्यक आहे . आपण कपडे शिवून विकत असू , तर आपल्याकडे कौशल्य हवे . माल बाहेरून आणून विकत असू , तर नफ्याचे प्रमाण किती ठेवायचे हे ठरवा . मार्केटमधील बदलत्या ट्रेंडनुसार अपडेटेड राहा . त्याचबरोबर आपल्या मर्यादा माहीत करून घ्या . निव्वळ हौस म्हणून , घर सांभाळून वेळ मिळेल तेव्हा व्यवसाय करायचा आहे की खरेच , हा व्यवसाय आपण सातत्याने करू इच्छितो का आपण देत असणान्या वस्तूचा / सेवेचा दर्जाही उत्तम असायला हवा . त्याच्या जोडीने पकजिंग आणि प्रेझेंटेशन महत्त्वाचे आहे . घरी बनविलेले पदार्थ , वस्तु तम्ही विकत असाल , तरी त्याला आकर्षक बडिंग करा . बदलत्या मार्केटनुसार आपल्या प्रॉडक्ट आणि पैकेजिंगमध्ये बदल करायला हवे . तसेच त्यात अतिरिक्त नावीन्य आणायचा प्रयत्न करा . सोशल मीडियाचाही यासाठी तुम्हाला फायदा करून घेता येईल . बॅकवर्ड - फॉरवर्ड लिंकेजेस ( म्हणजे आपल्या धंद्याला लागणाऱ्या कच्चा • मालाच्या वापरातून - बॅकवर्ड आणि तयार उत्पादनापासून इतर उत्पादन • बनवणे - फॉरवर्ड ) सारखा आणखी • एखादा धंदा करता येतो , का ते पाहा . माल ( सोर्सिंग ) कुठून येणार त्याकडेही लक्ष द्यायला हवे . प्रत्येक वेळी आपण स्वत : जाऊन माल खरेदी करण्यापेक्षा तिकडे संपर्क स्थापन करा , पैसे पाठवा आणि घरपोच माल मिळवा . मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायात सातत्य हवे , एकाच धंद्यात तुम्ही टिकून राहणे महत्त्वाचे आहे . आज रांगोळी , उद्या शिवणकाम , परवा वेगळच काहीतरी असला प्रकार करू नका . यामुळे तुम्ही६ कोणताही धंदा धड करू शकणार नाही.

                            

4. उद्योगधंद्यासाठी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक परवानग्या कोणत्या व बैंक अकाउंटचे महत्त्व काय ?-

घराबाहेर , तसेच घरगुती स्तरावर व्यवसाय करणार असाल , तर शॉप अँड एस्टेब्लिशमेंट अॅक्ट लायसन्स आणि पॅन कार्ड आवश्यक आहे . तुम्ही दुकान किंवा टपरी घेत असाल , तर महानगरपालिकेची टॅक्स पावती आणि गुमास्ता लायसन्स काढावे लागते . तुम्ही जर अन्नपदार्थ विकणार असाल , तर तुम्हाला फूड अँड ड्रग अॅक्ट अंतर्गत लायसन्स घ्यावे लागते आणि दरवर्षी ते रिन्यू करावे लागते . आधार कार्ड तर आता सगळ्यांसाठी बंधनकारक झाले आहे . . त्याचबरोबर वेगळे बँक अकाउंट उघडून आपल्या धंद्याचे ठराविक उत्पन्न बँकेत टाकायला हवे व त्याच खात्यातून व्यवसायासाठीचा खर्चसुद्धा केला पाहिजे . बँकेमार्फत आपल्या उत्पन्नाच्या एन्र्टीज ठेवायला हवे. याचा फायदा  बँकेकडून कर्ज घेतेवेळी होईल , बँकेच्या / चेकच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास त्याच्या एन्ट्रीज मिळतात आणि त्या आधारे बँक आपल्याला हवे असणारे कर्ज मंजूर करताना काही प्रश्न उभे करत नाही . टॅक्स वाचविण्यासाठी रोखीने व्यवहार कराल , पण नंतर जेव्हा धंदा वाढविण्यासाठी कर्ज हवे असेल तेव्हा तुम्हाला बँकेला आपल्या व्यवसायाची उलाढाल कर्ज काढण्यासाठी कशी दाखवता येणार ? यासाठी सामान्य ज्ञान वाढवा , बँकेचे व इतर आर्थिक व्यवहार समजून घ्या . स्मार्टनेस वाढवा . बँक मॅनेजरही तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करू शकतात . 
                 
                        


5. स्पर्धा मोठी की सहकार्य ?-

गृहोद्योग करायचा , तर आपले कौशल्य काय आहे , त्यातून आपल्याला किती पैसे मिळू शकतात , हे बघायला . हवे . त्याचबरोबर आपल्या कामाचे पैसे दर स्पर्धात्मक हवा . तुमच्या कामाचा दर इतरांपेक्षा अधिक असेल , तर काम मिळणार नाही आणि कमी असेल , तर तुमचे नुकसान होईल . त्यामुळे तुम्हाला बाजारभाव माहीत असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर आपले स्पर्धक आपल्याला माहीत असायला हवेत आणि या स्पर्धकांशी आपली ' हेल्दी कॉम्पिटिशन ' असली पाहिजे . स्पर्धकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करून आपल्या सगळ्यांनी थोडे । कार्य करून आपल्या सगळ्यांनी थोडे वेगवेगळे ग्राहक / मार्केट शोधण्याचा प्रयत्न करायला हवा . एकमेकांचा धंदा मारण्याचा प्रयत्न करू नये . ते चुकीचे ठरते . त्यामळे स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य हे तत्त्व अवलंबणे अधिक फायद्याचे ठरेल . .

                

6 . कर्मचारीवर्ग कसा निवडावा ?-

 गरज नसेल , तर कर्मचारी ठेवू नका . आपला व्यवसाय कोणता , त्यातील उलाढाल किती , उत्पन्न किती याचा विचार आधी करा . त्यानुसार मग आपल्याला व्यवसायात खरेच मदत हवी असेल , तर कर्मचारी ठेवा . स्वत : ला काम करावे लाग नये किंवा इतरांना सांगण्यासाठी / दाखविण्यासाठी बरेच जण नोकरवर्ग ठेवतात . पण तसे करू नका . शक्य तेवढे काम स्वतः करा . व्यवसायाचा अवाजवी पसारा वाढवू नका . जमेल तेवढ्या कमी खर्चात अधिक व्यवसाय करा . कर्मचारी ठेवायचे झाल्यास किमान वेतन कायद्याप्रमाणे ( मिनिमम वेज अॅक्ट ) कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागेल हादष्टिकोन ठेवला पाहिजे . कर्मचाऱ्यांचा पगार देऊन त्यापेक्षा अधिक रक्कम आपल्या हातात आली पाहिजे . हा हिशोब आधीच करायला हवा . नाहीतर नुकसानच अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यापेक्षा आपल्या घरातील सदस्यांची मदत व्यवसायात मिळू शकेल का , हे बघा .

                 


७ . जीएसटी आदी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ?-

जीएसटीचा मुद्दा गृहोद्योगाच्या बाबतीत तेवढा लागू होत नाही . २० लाखांहन अधिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायांसाठी जीएसटी लागू होतो . महिलांसाठी आयकर मर्यादा तीन लाख करण्यात आलेली आहे आणि २० लाखांच्या खाली जीएसटीचा मुद्दा काही लागू होत नाही . त्यामुळे हा मुद्दा आता एवढ्यात लक्षात घेण्याचे कारण नाही .

                        

     सर्वात शेवटी मी हेच म्हणेल की प्रयत्न करत रहा,  यश नक्कीच मिळेल.
     आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

    "I don't believe in taking right decisions. I take decisions and then make them right."

                                - Ratan Tata Sir


                       धन्यवाद!






Comments

Popular posts from this blog

How much Earning of Top 10 Most Famous YouTube Channels in March 2020 | YouTube Earning

Earning and Information Of Most Subscribed channel on YouTube in March 2020  1) T - Series Super Cassettes Industries Private Limited, doing business as T-Series, is a music record label and film production company in India founded by Gulshan Kumar in 1983. It is primarily known for Bollywood music soundtracks and Indi-pop music. As of 2014, T-Series is India's largest music record label, with up to a 35% share of the Indian music market, followed by Sony Music India and Zee Music. T-Series also owns and operates the most-viewed and most-subscribed channel on YouTube, with over 132 million subscribers  and 100 billion views as of March 2020. While best known as a music label, T-Series has also had some moderate success as a film production company. ● Total Subscribers - 132M ● Earning   in $ - $1.01M 2) PewDiePie  Felix Arvi...

IMP Questions and Answers for Physics HSC Board Exam Feb 2021

1) Describe the construction of photoelectric cell. Ans - Construction — Photocell consists of evacuated glass tube containing two electrodes emitter (K) and collector (A).The emitter is shaped in the form of a semi hollow cylinder. It is always kept at a negative potential.The collector is in the form of a matal rod and fixed at the axis of the semi-cylinderical emitter. The collector is always kept as a positive potential.The glass tube is fitted on non-metallic base and pins are provided at the base for external connection. Working — The emitter is connected to negative terminal and collector is connected to positive terminal of a battery.A radiation of frequency more than threshold frequency of material of emitter is made incident on the emitter. Photo-emissions take place. The photoelectrons are attracted towards the collector which is positive w.r.t the emitter. Thus, current flows in the circuit.If the intensity of incident radiation is increased, the photoelectric cur...

OK या शब्दा मागचा खरा इतिहास । History Of Ok Word

OK चे Full Form काय आहे? हा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आला असावा. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की OK हा OKay मराठी भाषेत म्हटल्यास OK या शब्दाचा एक छोटा फॉर्म आहे, ज्याचा अर्थ 'ठीक आहे' आहे, परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही गोष्ट नाही. इतिहासात OK हा शब्द खूप जुना आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज या लेखाद्वारे ओके चे पूर्ण रूप काय आहे, आम्ही आपल्याला सांगू की Ok चे पूर्ण रूप मराठीमध्ये काय आहे, तसेच आम्ही आपल्याला सांगू की Ok या शब्दाचा उगम झाला कसा, जो Ok या शब्दाचे आणखी Full Form आहे. मराठी मध्ये ओके फुल फॉर्मचा वापर कुठे इ. मग विलंब न करता प्रारंभ करूया. OK  पूर्ण फॉर्म "All Correct" आहे. OK  एक संज्ञा आहे जी सामान्यपणे सामान्य बोलण्यात वापरली जाते. OK हा शब्द जगातील सर्वात बोलला जाणारा शब्द आहे, या गोष्टीचा उल्लेख बीबीसी आणि इतर बर्‍याच वेबसाइट्सने देखील केला आहे. काही वेबसाइट्सच्या मते, OK हा शब्द Hello नंतर सर्वात बोलला जाणारा शब्द आहे. OK हा शब्द इंग्रजी शब्द आहे परंतु इंग्रजी भाषिक देशांमध्ये तसेच अन्य देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये वापरला ...