करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी झटत असलेले पुण्यातील नायडू हॉस्पिटल चा इतिहास । History Of Naydu Hospital , Pune
सध्या संपुर्ण जगात करोनानी हाहाकार घातला आहे. पूर्ण जग करोनाशी लढा द्याचा प्रयत्न करतय .तर चला आज आपण सव्वाशे वर्षा पासुन संसर्गजन्य अजारांशी मुकाबला करणाऱ्या पुण्यातील नायडू हॉस्पिटल विषयी जाणून घेऊया.
सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला नायडू रुग्णालय करीत आहे . पुण्यात १८९७ मध्ये प्लेगने हाहाकार उडवून दिल्यानंतर संसर्गजन्य रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय झाला . पुणे नगरपालिका , सबर्बन नगरपालिका , जिल्हा लोकल बोर्ड आणि मुंबई सरकार यांच्या सहकार्याने हे रुग्णालय सुरू झाले . या रुग्णालयाला कालांतराने ' डॉ . नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय ' म्हणनही संबोधले जाऊ लागले . प्लेग , देवी , कॉलरा , इन्फ्ल्युएन्झा , पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू ( एचवनएनवन ) , बर्ड फ्लू , सार्स , इबोला , निपाह आणि सध्या वेगाने पसरत असलेल्या करोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय पुणेकरांच्या दिमतीला उभे आहे . मुंबईतन १८९६ सुरू झालेल्या प्लेगच्या साथीचा १९ डिसेंबर १८९६मध्ये पुण्यातही प्रादुर्भाव झाला . रास्ता पेठेत प्लेगचा पहिला आणि २७ डिसेंबर १८९७ला कसबा पेठेत दुसरा रुग्ण सापडला . त्यानंतर २४ फेब्रुवारी १८९७पासून या साथीने उग्र रूप धारण केले . ' प्लेग संसर्गजन्य आजार असल्याने बाधितांना सर्व रोग्यांना एकत्र ठेवण्यासाठी मळा - मठेच्या संगमाजवळ प्लेग इस्पितळ सरू करण्यात आले . त्याचे रूपांतर पढे सांसर्गिक रोगांच्या इस्पितळात झाले . सध्या ते डॉ . नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय म्हणून प्रसिद्ध आहे , ' असा उल्लेख डॉ . मा . प . मंगुडकर यांच्या पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ ' या पुस्तकात आहे . संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णाचा इतरांशी कोणत्याही प्रकारे संपर्क येऊ नये , याची काळजी घेण्यासाठी त्या काळच्या शहराबाहेर रुग्णालय बांधण्यात आले . आता शहर वाढल्यानंतर हे रुग्णालय मध्यवस्तीत आले . एखाद्या आजारावर लस किंवा औषध सापडलेले नसताना ( किंवा सापडल्यानंतरही ) हा आजार रोखण्याचा एकमेव उपाय करणारे ठिकाण , अशी नायडू रुग्णालयाची ख्याती आहे . पुणे नगरपालिका सुरुवातीला रुग्णालयाच्या एकूण खचापैकी ५४ टक्के खर्च उचलत होती . हा खर्च अधिक असून तो कमी करण्यात यावा , या मागणीनंतर १९२०मध्ये नव्या योजनेप्रमाणे एकूण खर्चाच्या टक्के खर्चाची जबाबदारी नगरपालिकेवर टाकण्यात आली . त्याच वेळी लष्करी खाते ( २७ टक्के ) , सबर्बन खाते ( ४ टक्के ) , जिल्हा लोकल बोर्ड ( ३ टक्के ) आणि मुंबई सरकार ( ३२ टक्के ) असा खर्च उचलण्याचा निर्णय झाला . १९३५ च्या घटनेप्रमाणे मुंबई राज्यात सार्वत्रिक निवडणुका होऊन काँग्रेसचे मंत्रिमंडळ स्थानापन्न झाले होते . ब्रिटिश सरकारने पुणे नगरपालिकेबाबत स्वीकारलेल्या ' सहानुभूतिशून्य धोरणा ' च्या विरोधात नव्या मंत्रिमंडळाकडे दाद मागण्यात आली आणि १ नोव्हेंबर १९३८ला तत्कालीन आरोग्यमंत्री नामदार डॉ . गिल्डर यांनी परिषद बोलावून याबाबतचा निर्णय घेतला . हीच व्यवस्था १९५०पर्यंत सुरू होती . पुणे नगरपालिकेचे १९५०मध्ये महापालिकेत रूपांतर झाले आणि त्यानंतर सांसर्गिक रोगांचे हे रुग्णालय संपूर्णपणे महापालिकेच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला . मुंबई सरकारने १९५१मध्ये रुग्णालयाचा कारभार महापालिकेच्या हाती सोपविला . तर नायडू हॉस्पिटल अजून पर्यंत उभे आहे अनेक संसर्गजन्य अजारांशी मुकाबला करण्यासाठी .
Comments
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.